मुंबई – सर्वांचं लक्ष लागलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सकाळी मतजानाचा हक्क बजावला. सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अजित पवार यांनी बारामतीतल्या काटेवाडी इथे मतदान केलं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केलं.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही आज मतदान केलं. मी केलेय… आपणही करा मतदान, आपला हक्क बजावून! लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले योगदान द्या. असं मलिक यांनी म्हटलं आहे.
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #RightToVote #MaharashtaElections2019 #Vidhansabha2019 https://t.co/Aag9tau8L3
भाजप नेते आशिष शेलार यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जास्तीजास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावला! आपणही लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं शेलार यांनी म्हटलं आहे.
https://t.co/EAwWRY41YQ
I cast my vote 4 continued development of our Bandra- khar-Santacruz & our state ! I urge all citizens 2 vote & exercise ur constitutional right ! pic.twitter.com/KKWr6xISSp
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 21, 2019
साताऱ्यातून भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोणी येथे, जि. प. अध्यक्षा ना. शालिनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील,माजी मंत्री श्री.आणासाहेब म्हस्के पाटील,धनश्री विखे पाटील, समवेत मतदानाचा हक्क बजवला. https://t.co/oPzunMun9C
COMMENTS