मुंबई – काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्याआधीच भाजप नवी खेळी खेळणार असल्याचं बोललं जात आहे. प्रकाश आंबेडकर यांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. राज्यातील भाजप नेत्यांना तशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. लवकरच ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती अहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची ऑफर स्वाकारली तर आगामी निवडणुकीत याची फटकी काँग्रेस-राष्ट्रवादीला बसू शकतो. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीला मोठा फटका बसला. आघाडीचे अनेक मतदार फुटल्यामुळे याता फायदा थेट भाजपला झाला. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS