माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर !

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर !

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एम्स रुग्णालयानं दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटीन रुग्णालयाकडून सादर करण्यात आलं असून वाजपेयी यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ९३ वर्षीय वाजपेयी यांना ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या २४ तासांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती असून कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्स जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जवळपास ५० मिनिटे ते रुग्णालयात होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी एम्स गाठले आहे.दरम्यान आज सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेदेखील रुग्णालयात दाखल झाले आहेत.

 

COMMENTS