‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट यावर्षा अखेरपर्यंत प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा दिग्दर्शन विजय रत्नाकर हे करीत असून संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित आहे. त्यात अनेक प्रमुख नेत्यांची भूमिका दाखवली जाणार असून तत्पूर्वी या चित्रपटातील काही महत्वपूर्ण भूमिकांसाठी कलाकारांची निवड करण्यात येत असून नुकतीच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे.
‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मनमोहन सिंग यांच्या आयुष्याबाबत, राजकीय कारकिर्दीबाबत काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका अभिनेता अनुपम खेर साकारणार असून अक्षय खन्ना संजय बारू यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
मनमोहन सिंग आणि संजय बारु यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्यांची निवड करण्यात आल्यानंतर आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठी राम अवतार भारद्वाज या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विवरवर दिली असून त्याच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.
याबाबत ट्विट करत अनुपम खेर यांनी म्हटलं आहे, ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत राम अवतार भारद्वाज यांना सादर करत आहोत.
मनमोहन सिंह यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारूंच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाने काही दिवसांपूर्वी देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.त्याप्रमाणेच या पुस्तकाच्या नावावरुनही मोठा वादंग निर्माण झाला होता.त्यामुळे या पुस्तकावर आधारित चित्रपटामुळे आता आणखी कोणता नवा वाद होणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २१ डिसेंबर रोजीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
COMMENTS