नामांतर हा आपल्याकडील नवा ट्रेंड नाही. अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. आता दिवंगत माजी पंतप्रधान यांच्या नावानंही एक शहर ओळखलं जाणार आहे. छत्तिसगडीमधील नया रामपूर शहर हे यापुढे अटलनगर म्हणून ओळखलं जाणार आहे. छत्तिसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी याबाबात घोषणा केली आहे. नया रायपूर हे शहर छत्तिसगड राज्याची प्रस्तावित राजधानीचं शहर आहे. त्यामुळे या शहराला महत्व आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री रमणिसंग यांनी ही घोषणा केली आहे. या वर्षाअखेर छत्तिसगडमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. अटलनगर नाव दिल्यामुळे त्यांना आता निवडणुकीत किती फायदा होतो ते आता पहावं लागेल.
Naya Raipur will be renamed as Atal Nagar: Chhattisgarh CM Raman Singh #AtalBihariVajpayee (file pic) pic.twitter.com/PiVTNgqqRZ
— ANI (@ANI) August 21, 2018
COMMENTS