शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याबाबत रामदास आठवलेंचं स्पष्टीकरण !

शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याबाबत रामदास आठवलेंचं स्पष्टीकरण !

उल्हासनगर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीसोबत जाण्याबाबत रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पतिक्रिया दिली आहे. सध्या युतीशिवाय रिपाईसमोर दुसरा पर्याय नसून पुन्हा एकदा शिवसेना भाजपा सोबत जागा सोडण्याची चर्चा करणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई या जागा आम्हाला मिळाव्यात, शिवसेना-भाजपाने आम्हाला त्यांच्या कोट्यातली एक एक जागा द्यावी

आमच्या दोन जागा निवडून आल्या, तर पक्षाला महाराष्ट्रात मान्यता आणि चिन्ह मिळेल असंही आठवले यांनी म्हटलं आहे.कार्यकर्त्यांची युतीतून बाहेर पडण्याची भावना आहे, मात्र सध्या युतीतून बाहेर पडणार नसल्याचं आठवलेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाचा अपमान होऊ नये, आम्ही जिंकण्यात मदत करत असतो. मी राज्यसभेवर आहे, म्हणून मला लोकसभा देऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल तर ती भूमिका चुकीची आहे.

काँग्रेसचे अनेक खासदार निवडणुकीत पडल्यानंतर पाच पाच, दहा दहा वर्षे सरकारी बंगल्यात राहिले, पण काँग्रेसने माझं सामान दोनच महिन्यात बाहेर काढून फेकलं असा आरोपही यावेळी आठवलेंनी आघाडीवर केला आहे. उल्हासनगरे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्जिकल स्ट्राईक आणि एयर स्ट्राईकवरही आठवले यांनी प्रतिक्रिया दिली असून हल्ला करणं हे वायुसेनेचं काम आहे. किती मेले हे मोजण्याचं काम सरकारचं आहे. लोक पुरावे मागतात, पण यावर राजकारण होऊ नये. राष्ट्रवादी भूमिका ठेवणारे राज ठाकरे आरोप करतात की मोदींनी ४० जवान मारले, हे योग्य नसल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे.

तसेच सर्जिकल स्ट्राईक केला तर विरोधक पुरावे मागतात, नाही केला तर तिकडूनही टीका करतात, ही दुटप्पी भूमिका आहे. मसूद अजहरसोबतच दाऊद इब्राहिमलाही पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावं. आतंकवाद्यांना देशात ठेवणं चुकीचं आहे, मात्र इम्रान खान यांची भूमिका सकारात्मक दिसतेय. अभिनंदनला सोडलं, तसंच आता दहशतवाद संपवा. पाकिस्तानने भारताशी मैत्री केली, तर भारत पाकिस्तानला विकासात मदत करेल असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS