मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसडून मोठा फेरबदल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसकडून सुभाष झांबड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे परंतु, त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नाही, त्यामुळे काँग्रेसची अधिकृत उमेदवारी आमदार अब्दुल सत्तार यांनाच दिली जाणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान झांबड यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच मी निवडणूक लढणारच असा दावा सत्तार यांनी केला होता. जाहीर सभा घेऊन शक्तीप्रर्दशनही केले होते. त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे सत्तार हे शिवसेना आणि एमआयएम उमेदवाराला तगडे आव्हान देऊ शकतात अशी चर्चा सुरु झाली होती.
सत्तार यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच असे आव्हान केल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी सत्तार यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा औरंगाबादेत सुरु आहे.सत्तार हे ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS