औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेत आज मोठा गोंधळ पहायला मिळाला. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा गोंधळ झाला असून गोंधळ घालणाय्रा एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरुन हा गोंधळ झाला.
दरम्यान एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्ताव मांडला. त्यानंतर काही नगरसेवकांनी इतर खासदारांचे अभिनंदन करण्यात यावे, अशी मागणी मांडली. यावरुन नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सभेत गोंधळ सुरु झाल्यानंतर एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौर नदंकुमार घोडे यांनी एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे एका दिवसासाठी सदस्यत्व रद्द केले.
COMMENTS