औरंगाबाद – महानगरपालिकेत आज भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यास भाजप नगरसेवकांनी सभागृहातच बेदम मारहाण केली आहे. सेनचे राजू वैद्य यांनी भारतरत्न अटलजीच्या श्रद्धांजली प्रस्ताव मंडताच मतीन यांनी विरोध केला, ते ऐकताच संतप्त नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे त्यांच्यावर धावून गेले, सर्व नगरसेवकांनी त्यास जोरदार मारहाण केली व सभागृहाबाहेर पिटाळून लावले. त्यानंतर सय्यद मतीनं यास कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.
COMMENTS