औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा समोर आला होता. मात्र, या मुद्द्यांवर महाविकास सरकारमध्येच दोन गट पडले आहेत. शिवसेना नामांतराच्या मुद्द्यावर ठाम आहे तर काँग्रेसनं मात्र विरोध केला आहे. त्यामुळे नामांतराचा हा वाद अधिकच पेटला आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी करत भाजप युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी लव औरंगाबाद असे फलक लावण्यात आलेल्या भागात नमस्ते संभाजीनगर असे फलक लावले.
महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्तानं शिवसेना कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनीही ही वेळ साधत शिवसेनेला मात देण्यासाठी शहरात नमस्ते संभाजीनगरची पोस्टर झळकावले आहेत. त्यामुळे शहर आणि औरंगाबाद विभागात राजकारण चांगले तापले आहे.
COMMENTS