औरंगाबाद – माजी महापौर आणि काँग्रेसचे नेते सुदाम मामा सोनेने आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला औरंगाबादमध्ये मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे. शिवसेनेत असताना ते औरंगाबाद महापालिकेचे महापौर होते. तसेच सोनोने यांच्यासह शिवसेनेचे नेते सचिन सोनोने आणि भाजपाचे कामगार नेते राहुल सोनोने यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती आहे.
दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौ-यादरम्यान सोनोने यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.नारायण राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली होती. त्यावेळीच सोनोने यांनी सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सुदाम सोनावणे यांचा सिडको हडको भागात दबदबा असून ते कुशल संघटक मानले जातात. नारायण राणे यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी अशीही त्यांची ओळख होती .
COMMENTS