जितेंद्र आव्हाडांनी पाकिस्तानी साखरेचा गोदाम फोडला !

जितेंद्र आव्हाडांनी पाकिस्तानी साखरेचा गोदाम फोडला !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी पाकिस्तानी साखरेचा गोदाम फोडला असल्याचं समोर आलं आहे. दहिसर गावातील एका गोदामात पाकिस्तानी साखर साठवली होती. ही माहिती मिळताच आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसोबत गोदाम फोडला असून तेथील साखरेचे पोते फोडून आंदोलन केलं आहे.

दरम्यान केंद्रातील  सरकारने पाकिस्तानातून  साखर आयात केली असून याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी दहिसर मोरी येथील गोडाऊनमध्ये आंदोलन केलं असून भाजप सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान राज्यातील हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नव्हे, तर साखर चोळण्याचं काम मोदी सरकार करत असून ही साखर विकत न घेण्याचं आवाहन आव्हाड यांनी  केलं आहे. तसेच ज्या गोदामात ही साखर सापडेल त्या गोदामाला आग लावण्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे. भारतीय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानची साखर आयात करण्याचं धोरण सरकारने आखलं आहे. मात्र ही साखर भारतात विकू देणार नसल्याचंही आव्हाड यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS