नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेने 5 ऑक्टोबररोजी देशातील 36 संतांची बैठक बोलावली आहे. या संतांची समिती 5 ऑक्टोबरला राम मंदिर निर्मितीसाठी कार सेवकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिरासाठीचं आंदोलन पुन्हा सुरु होणार असल्याचं दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विहिंपने सर्व संतांना पत्र जारी केलं असून या पत्रात मंदिरासाठी निर्णय घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान अयोध्या वादातील दोन्ही पक्षांनी या प्रश्नावर सहमतीने तोडगा शोधल्याचा दावा 16 सप्टेंबरला राम जन्मभूमी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष वेदांत यांनी केला होता. काही आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून यावर तोडगा निघाला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर विहिंपनंही राम मंदिराच्या निर्मितीसाठी पावलं उचलली असून राम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन छेडलं जाणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS