अयोध्येतील जागेवर मंदिरच उभारले जाणार – मोहन भागवत

अयोध्येतील जागेवर मंदिरच उभारले जाणार – मोहन भागवत

अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच राम मंदिरच उभारले जाणार, असा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. येथे आयोजित धर्म संसदेमध्ये त्यांनी दोन हजार हिंदू संतांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राम जन्म भूमीवरच राम मंदिर बांधणार असल्याचे स्पष्ट केले.

धर्म संसदेला देशभरातील मठांचे प्रमुख आणि विश्व हिंदू परिषदेचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी भागवत म्हणाले, ‘आपण राम मंदिर बांधू. ही काही लोकप्रियतेसाठी केलेली घोषणा नाही. तर तो विश्वास आहे आणि तो ढळणार नाही. मंदिराचा वाद कोर्टात असला, तरी अनेक वर्षांच्या बलिदानानंतर आता राम मंदिर उभारणे शक्य असल्याचे दिसू लागले आहे.’ अयोध्येतील जागेवर केवळ राम मंदिरच उभारले जाईल आणखी काहीच नाही, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

 

COMMENTS