नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांनी आज विधानभवनामध्ये विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बाबाजानी दुर्राणी यांना विधानसभा सदस्याद्वारा निर्वाचितमधून ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे.
विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी @NCPspeaks पक्षाच्या वतीने आज @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @AshokChavanINC @RVikhePatil @dhananjay_munde यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन, नागपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. pic.twitter.com/pU2zzGV8RK
— Babajani Durrani (@babajanidurrani) July 5, 2018
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माणिकराव ठाकरे आदींसह दोन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.
COMMENTS