आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी भरणार विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज!

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी भरणार विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज!

नागपूर – आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे बुधवारी  दुपारी एक वाजता नागपूर येथे आपला उमेदवारी अर्ज विधान भवन नागपूर येथे भरणार आहेत.

बाबजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी येथील विधानपरिषद येथील माजी आमदार होते. परभणी, हिंगोली मतदार संघासाठी गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा काँग्रेसला दिली होती. त्यामुळे बाबजानी दुर्राणी हे नाराज असल्याच कळत होतं. परंतु पक्षाने आमदारातून सहज निवडून येणाऱ्या जागेसाठी बाबजानी यांना उमेदवारी दिली असून आज दुपारी विधान भवन नागपूर येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच कळतंय. बाबजानी दुर्राणी यांनी पक्षाशी राखलेल्या निष्ठेच बक्षीस त्यांना मिळत असल्याच बोलल जातंय.

COMMENTS