भाजपमध्ये वाचालविरांची संख्या काही कमी नाही. सातत्याने कोणी कोणी काहीतरी वायफळ बडबड करत असतो. आता तर केंद्रीय मंत्र्यानं चक्क एका कार्यक्रमामध्ये एका अपंग व्यक्तीलाच धमकी दिली. विशेष म्हणज्ये तो कार्यक्रम अपंग लोकांसाठीच आयोजित केला होता. अपंगाना व्हिलचेअर देण्याचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रम भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रिओ यांचा राग अनावर झाला. आणि त्यांनी थेट एका अपंग व्यक्तीला पाय तोडीन अशी धमकी दिली.
मंत्रिमहोदयांचं भाषण सुरू होतं. आणि तो अपंग व्यक्ती एका जागेवरुन दुस-या जागेवर जात होता. त्याचा मंत्रिमहोदयांना त्रास झाला आणि मग त्यांनी त्यांचा राग त्याच्यावर काढला. एवढच नाही तर त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकाला त्याचा पाय तोडा आणि त्याला व्हिलचेअर द्या असंही सांगितलं. गायक असलेले बाबुल सुप्रियो यांच्या डोक्यात खूप कमी काळात सत्तेची मस्ती चढलेली आहे. अशा नेत्यांना भाजपने आवर घालण्याची गरज आहे. पश्चिम बंगालमधील असनोलमध्ये हा प्रकार घडला.
COMMENTS