नागपूर – आमदारांवर दाखल होणा-या विविध गुन्ह्यांबाबत आमदार बच्चू कडू यांनी आज विधीमंडळात आवाज उठविला . कायदा आपण बनवतो पण 353 कलमाचा सगळ्यात जास्त वापर आमदारांविरोधात होतो. एखादा आमदार बोलला तर 2 वर्षांची शिक्षा होते तसेच मी जोराने बोललो म्हणून शिक्षा झाली असल्याचं बच्चू कडू यांनी सभागृहात बोलत असताना म्हटलं. मंत्रीमहोदय मर्द असाल तर मंत्रालयात आंदोलन करुन दाखवा असं आव्हानही यावेळी बच्चू कडू यांनी मंत्र्यांना केलं. तसेच आम्हीही मंत्रालयात आंदोलन करु शकलो नाहीत त्यामुळे आम्ही पण नामर्द ठरलो. ही सुधारणा आणली पाहिजे. आम्ही घरचं काम घेऊन जातो का, लोकांचं काम घेऊन गेलो तर अधिकारी फाईल अडकवून ठेवतो. फाईल बाहेर निघत नाही त्यामुळे आतापर्यंत सेवा हमी कायद्याद्वारे या अधिकाऱ्यांवर कारवाई केली? असा सवालही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत काय अर्थ तुमचा, आमदारवर असा प्रसंग येतो, 353 एका मिनिटात होतो, शरम वाटते आमदार व्हायची अजून किती धुवाल अधिकाऱ्यांची, उद्या फक्त कपडे धुवायची बाकी राहिले आहेत, ते ही धुवायला सांगितले तर तुम्ही धुवाल असा टोलाही यावेळी कडू यांनी मंत्र्यांना लगावला. तसेच मनात आले तसे लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करतात. सामान्य लोकांचा आवाज मंत्रालायपर्यंत पोहचवण्यासाटी आम्ही बोलतो त्यामुळे 353, 186 मध्ये सुधारणा करुन कायद्यात बदल करण्याची मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली आहे. तसेच अधिकारी, कर्मचारी मंत्रालयात आंदोलन करतात ,सामान्य माणसाला आझाद मैदानाला आंदोलन करावं लागतं अशी खंतही यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS