मुंबई – पाकिस्तानने भारतातील अतिरेक्यांची हत्या केली असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. या दानवेचा डीएनए तपासून घ्या हा पाकिस्तानचा असू शकतो अशी जोरदार टीका बच्चू कडू यांनी केली आहे. भारतीय जवानांना अतिरेकी म्हणणारा साला दानवे तुम्ही खासदार करणार का? असा सवालही बच्चू कडू यांनी जनतेला केला आहे. चक्क चौकीदारानेच शहीद जवानांना अतिरेकी म्हटले आहे. त्यामुळे हा कसला चौकीदार, हा तर पाकिस्तानी आहे. त्यामुळे शहीद जवानांना अतिरेकी म्हणणाऱ्या दानवेला मतदान करणे देशद्रोह ठरेल असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
COMMENTS