मुंबई – राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महापरिक्षा पोर्टल बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे. महापरिक्षा पोर्टल हे स्पर्धा परीक्षाचे ढिसाळ नियोजन करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी खेळत असल्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्याबाबत जाब विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू कार्यकर्त्यांसह राज्य माहिती संचानालय संचालक प्रदीप पी. यांची मंत्रालयात भेट घेऊन कारवाईचीही मागणी केली. मात्र त्याव त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बच्चू भडकले.
महापरिक्षा पोर्टलद्वारे गेल्या काही महिन्यात अन्न व पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता अधिकारी, नगरपरिषद नगरपंचायत भरती या परीक्षा घेण्यात आल्या आहेत…मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अडचणी आल्या असून, त्या अडचणी सोडविण्यासाठी फोन, ई मेलचा काहीही फायदा झाला नसल्याचं समोर आलं आहे.
विद्यार्थ्यांच्या पोर्टलबाबत काय आहेत तक्रारी ?
बैठक व्यवस्था सामूहिक कॉपी करता येईल अशी आहे.
*संगणक, माउस परीक्षा सुरु असताना बंद पडणे.
* पेपर दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे नसणे.
*दिलेल्या वेळे व्यतिरिक्त सुद्धा लॉगिन करून पुन्हा पेपर सोडवला जाऊ शकतो.
* याशिवाय मुलांच्या अडचणी सोडविण्यासाठी पर्यवेक्षक उपस्थित नसणे.
याबाबत प्रहार संघटनेनं मुख्यमंत्र्याना निवेदन देऊन हे पोर्टल बंद करावे आणि पुन्हा सरकारच्या mpsc.gov.in या पोर्टल द्वारे सर्व परीक्षा घ्याव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन देणार आहे. आज पुण्यात, तर 1 ऑक्टोबरला मुंबईत विद्यार्थ्यांसोबत प्रहार संघटना आंदोलनात उभी राहणार आहे, अशी माहिती ऍड. अजय तापकीर यांनी दिली आहे.
COMMENTS