नागपूर – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्यासाठी या निवडणुकीत काम केल्याचा आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी 20 जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह राजीनामा दिला आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालपूर्वीच वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली असून प्रकाश आंबेडकर यांना हा मोठा धक्का असल्याचंबोललं जात आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नाही. याउलट वंचितमुळे 7 ते 8 ठिकाणी भाजपला विजय मिळण्यास मदत होईल. वंचित आघाडीच्या 99 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावाही मिलिंद पखाले यांनी केला आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडीच्या अपयशात आम्ही वाटेकरी ठरु नये, यासाठी निवडणुकीच्या निकाल लागण्याआधीच आम्ही राजीनामा दिल्याचे पखाले यांनी म्हटले आहे. य
COMMENTS