सिंधुदुर्ग – काँग्रेस आमदार नितेश राणे यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या 18 समर्थकांसह न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्व आरोपींना जामीन देण्यात आला आहे. जामीन देताना नितेश राणेंसह सर्व आरोपींना अटी घालण्यात आल्या आहेत. प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही आणि पोलिसांना तपासात सहकार्य करावे अशी अट घालण्यात आली आहे.
दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन आमदार नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडेंसह 17 समर्थकांनी उपअभियंता प्रकाश शेडकर यांना चिखलाने आंघोळ घातली होती. यावेळी रस्त्यावरील चिखल बादलीत भरून तो शेडकर यांच्या अंगावर ओतण्यात आला होता. कणकवलीतील गडनदीच्या पुलावर शेडकर यांना बांधून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नितेश व त्यांच्या १८ समर्थकांना अटक केली होती. या सर्वांना आज काही अटींवर जामीन मंजूर झाला आहे.
COMMENTS