मुंबई : राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. हे आपण अनेक वेळा पाहिले. एक वर्षांपूर्वी तर जे अनेक वर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक होते. ते लोक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. निवडणुक झाल्यानंतर जे अनेक दशक एकमेकांच्या नावे खडे फोडणारे तीन पक्ष एकत्र आले. त्यामुळे अनेक वर्षांची शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यानंतर या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना दररोज खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करीत असता, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दुर्मिल योग आख्या महाराष्ट्राला पहायला मिळळा.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह राज्यातील सर्व पक्षातील राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली. ते सर्वजण एका फ्रेजमध्ये कैद झाले.
वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर आरोपांचे फैरी झाडणारे नेते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राला एक चांगली राजकीय परंपरा आहे. राजकारण आणि वैयक्तिक संबंध या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. हे दोन्ही टोक एकमेकांजवळ कधीच पोहोचत नाही, असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येक पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा अजूनही तशीच अबाधित आहे हे आजच्या कार्यक्रमातून सिद्ध होत आहे
COMMENTS