शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा !

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या योजनेमार्फत शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार असून त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातील सादरीकरण करुन या योजनेची घोषणा केली आहे.

दरम्यान एसटी महामंडळाच्यावतीने शनिवारी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय कृतज्ञता दिन’ सोहळ्यात विविध योजनांचे लोकार्पण करण्यात आला. त्यावेळी ही घोषणा करण्यात आली असून या घोषणेमुळे राज्यातील शहीद जवानाच्या कुटुंबियांना मोठा आधार मिळणार आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान यावेळी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई उपस्थित होते.

COMMENTS