मुंबई – राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे रविवारपासून दिल्ली येथे दाखल झाले असून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यसभा खासदार राजीव सातव, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत.
काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीमध्ये सामिल होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाल्याने त्यांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. थोरात कोणत्याही क्षणी प्रदेशाध्यक्षपद सोडतील आणि नव्या प्रदेशाध्यक्षाची हायकमांडकडून घोषणा केली जाईल, अशी खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे
बाळासाहेब थोरात काल रविवारपासून दिल्लीत आले आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद असल्याने त्यांना पक्षासाठी हवा तसा वेळ देणं जमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात येणार असून राज्याला नवा प्रदेशाध्यक्ष देण्यात येणार आहे. राज्यसभा खासदार राजीव सातव, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर यांची नावे शर्यतीत आहेत.पक्षश्रेष्ठींकडून कोणत्याही क्षणी नवीन पक्षाध्यक्षाची निवड जाहीर करण्याची शक्यता आहे
COMMENTS