मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव चांगले पाहुणे आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्याच वर्षा बंगल्यावर जनावरे नेऊन बांधावीत. अशी टीका माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला शेतकय्रांना दिला होता. यावरुन बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थती निर्माण झाली आहे. सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दुष्काळात सरकारने जनतेला धीर देणे गरजेचे आहे. तातडीने पिण्याचे पाणी, चारा, रोजगार हमीची कामे दिली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली आहे. तसेच सर्वत्र दुष्काळ असल्याने कोणत्याही पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही. एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे, तिथेच जनावरे नेऊन बांधा, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.
COMMENTS