मुंबई – राज्यातील बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये घबराटीचं वातावरण पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बँकांवर दरोडा टाकून लुटण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉयीज् फेडरेशननं याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. बँकर्स संघटनेनं आपल्या सुरक्षेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.राज्य सरकारने यावर कायमस्वरुपी उपाययोजना करावी आणि बँक कर्मचारी तसेच ग्राहकांना सुरक्षा पुरवावी, असं बँकर्स असोसिएशननं या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान आरबीआयच्या माहितीनुसार बँक लुटण्याच्या घटनेत, दरोड्याचा घटनेत, महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. तर एकूण लुटलेल्या रक्कमेच्या आकडेवारीमध्ये राज्याचा पहिला नंबर लागतोय. ही आकडेवारी निश्चितच गंभीर असल्यामुळे बँकांची चिंता अधिकच वाढली आहे. त्यामुळे बँकर्स असोसिएशनच्या पत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS