पुणे – पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात शहरात बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील पाणी कपातीवरुन हे बॅनर लावण्यात आले असून ‘गिरीष काय रे?, दुष्काळ असताना देखील अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही’, असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. तसेच बॅनरखाली एक त्रस्त पुणेकर नागरिक असे लिहिण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर कोणी लावले आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु या बॅनवरमुळे शहरात चर्चेला उधाण आलं असल्याचं दिसत आहे.
दरम्यान शहरात पाणीकपात करण्याबाबत काल बैठक घेण्यात आली.या बैठकीत पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून शहरात पाणीकपात करण्यात येणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. परंतु पाणीकपात किती टक्के होणार हे अजून निश्चित झालं नसलं तरी यावरुन आता गिरीश बापट यांच्यावर मात्र टीका केली जात आहे.
COMMENTS