पुणे – बारामती माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले असून 21 जागांसाठी 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या सकाळी मतमोजणी होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
या निवडणुकीदरम्यान २०१५ साली झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड ताकत लावून प्रचारात उतरले होते. मागील पाच वर्षात कारखान्याच्या तांत्रिक बिघाडासह झालेल्या नुकसानीवर लक्ष्य करत सभासदांना सत्ता देण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय. तर सत्ताधारी गटाकडून या हंगामात दिलेल्या जादा ऊसदरावर सभासदांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच अजित पवार यांनी या निवडणुकीत मागील बाबींची पुनरावृत्ती होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेयल्यानं सत्ताधाऱ्यांचा कस लागणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो त्यामुळं या कारखान्याचा नावलौकिक महाराष्ट्र भर आहे. तसेच शरद पवार हे या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत सन १९९७ आणि २०१५ च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहीले आहे. मात्र मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातली सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला होता.त्यामुळे या निवडणुकीत विजय खेचून आणायचाच असा चंग राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बांधला होता.
COMMENTS