बारामती – ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान महादेव जानकर यांना धक्का बसला असून रासपचे बारामती लोकसभा अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी आपला राजीनामा पक्षाकडे दिला आहे. सोलनकर यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला असून जिल्ह्यात पक्षवाढीसाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्यामुळे जानकर यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान पक्षामध्ये अनेक पदाधिकारी काम न करता कुरघोड्या करतात. त्यामुळे अनेक पदाधिकारी पक्षातून बाहेर पडले आहेत. या गोष्टीकडे महादेव जानकरही दुर्लक्ष करत आहेत, अनेक लोकं पक्षात असून पक्ष वाढवण्याऐवजी पक्ष संपवण्याचं काम करत असल्याच सोलनकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS