मुंबई – अवघ्या काही तासात राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरवर अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. दादा आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून आला आहात. म्हणून आता आपण थांबू शकत नाहीत, महाराष्ट्राने आपलं नेतृत्व मान्य केलं आहे. महाराष्ट्राला आपली गरज आहे. आता आपण काय करायचं याचा निर्णय आम्हाला घेऊ द्या, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु राजीनामा देऊन ते पुन्हा राष्ट्रवादीत सामील झाले आहेत. त्यामुळे उद्या होणाय्रा शपथविधी सोहळ्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा अंदाज वर्तवला जात आहो. परंतु यापूर्वीच बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरवर अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. दादा आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून आला आहात. म्हणून आता आपण थांबू शकत नाहीत, महाराष्ट्राने आपलं नेतृत्व मान्य केलं आहे. महाराष्ट्राला आपली गरज आहे. आता आपण काय करायचं याचा निर्णय आम्हाला घेऊ द्या, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय,असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
COMMENTS