बारामती – आगामी लोकसभा निवडणूक बारामती मतदारसंघातून भाजपचा उमेदवारच जिंकणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर बारामतीमध्ये आज भाजपविरोधात पोस्टरबाजी पहायला मिळाली आहे. शहरात काही महत्वाच्या ठिकाणी लागलेल्या फलकांनी आज वातावरण ढवळून निघाले आहे. बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही, समस्त बारामतीकर, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आली आहेत.
दरम्यान शहरातील प्रशासकीय भवन, पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या दारावर काही अज्ञात व्यक्तींनी ही पोस्टर लावली आहेत. त्यामुळे या पोस्टरची राज्यभरात चर्चा सुरु आहे. हे फ्लेक्स आज शहरात चर्चेचा विषय होते. हे फ्लेक्स नेमके कोणी लावले याची कोणालाच कल्पना नसून या फलकाचा नेमका राजकीय अर्थ काय याबाबत सगळीकडेच चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे.
COMMENTS