पुणे – बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भर सभेत विद्यार्थिनीच्या आग्रहास्तव उखाणा घेतला असल्याचं समोर आलं आहे. पवार चॅरिटेबल ट्रस्ट व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड या गावात सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तीन हजार विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. यादरम्यान काही विद्यार्थिनींनी सुळे यांना त्यांच्या पतीचं नाव घेण्याचा आग्रह केला. विद्यार्थिनींनी खूपच आग्रह केल्यामुळे आणि त्यांच्या आनंदासाठी सुप्रिया सुळे यांनी उखाणा घेत त्यांच्या पतीचं नाव घेतलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास, सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास असा उखाणा घेतला.
राज्यातल्या काही जिल्ह्यांत 'नकोशी' या नावाच्या मुली आहेत. त्या मुलींनी 'हवीशी' करण्याचं काम आम्हा सर्वांना करायचं आहे. यासाठी महिलांना सक्षम करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. pic.twitter.com/MHrv4hShGT
— Supriya Sule (@supriya_sule) July 13, 2018
दरम्यान यावेळी सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. राज्यातल्या काही जिल्ह्यांत ‘नकोशी’ या नावाच्या मुली आहेत. त्या मुलींनी ‘हवीशी’ करण्याचं काम आम्हा सर्वांना करायचं आहे. यासाठी महिलांना सक्षम करण्याचं काम आपल्याला करायचं असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच हजारोंच्या जनसमुदायापुढे येऊन न घाबरता आपले प्रश्न मांडण्याचे धैर्य या मुलींकडे आहे. त्यांनी आपल्या समस्या मांडल्या, सूचना केल्या. त्यांच्या सामाजिक जाणिवा पाहिल्या की देशाचे भविष्य उज्ज्वल आहे याची खात्री पटते असंही यावेळी सुळे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS