दिल्ली – एनडीटीव्हीच्या माजी अँकर आणि प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांच्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. आपण नवीन प्रयोग करत आहोत. मात्र तो नवीन प्लॅन सुरू करु नये यासाठी आपल्याला सत्तेतील ताकदवान लोकांकडून धमक्या येत असल्याचं ट्विट बरखा दत्त यांनी केलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बरखा दत्त या लवकरच एक नवीन इंग्रजी चॅनल सुरु करत आहेत. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. नाव ठरलेलं नाही. अस असताना आज त्यांना त्यांना सत्तेतील काही ताकदवान नेत्यांचे मेसेज आल्याचा आरोप बरख दत्त यांनी केला आहे. आपण सुरु करत असलेले चॅनल सुरू करु नये, नवीन चॅनल सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा या मेसेजमधून देण्यात आल्याचा आरोपही बरखा दत्त यांनी केला आहे.
Received chilling veiled threats and "messages" from powerful people in the Establishment today that my family and I are under surveillance – and that I will be smeared & maligned to stop me from starting any new projects. Was advised to get my house debugged. Is this my country?
— barkha dutt (@BDUTT) June 7, 2018
COMMENTS