बार्शीतील व्यक्तीकेंद्रीत राजकारण उलथवण्यासाठी ‘हे’ प्राचार्य लढवणार विधानसभा निवडणूक!

बार्शीतील व्यक्तीकेंद्रीत राजकारण उलथवण्यासाठी ‘हे’ प्राचार्य लढवणार विधानसभा निवडणूक!

सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी सर्वच आजी माजी आमदार सर्वस्व पणाला लावत असल्याचं दिसत आहे. वेळ पडली तर हे नेते पक्ष देखील बदलत आहेत. बार्शीतील राजकारणही असंच काहिसं झालं आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बार्शी येथून शिवसेनेकडून आता सोपल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असला तरी तोच नेता आमदार होत असल्यामुळे अनेक ठिकाणचं राजकारण हे व्यक्तीकेंद्रीत झालं आहे.

बार्शीतील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार राजेंद्र राऊतही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. शिवसेना-भाजपमध्ये युती झाली तर ही जागा शिवसेनेला जाणार आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेकडून सोपल निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. त्यामुळे युती झाली तर राजेंद्र राऊत हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

बार्शीतील व्यक्तीकेंद्रीत राजकारण संपवण्यासाठी बार्शी येथील प्राचार्य असलेल्या खुशाल मुंढे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे. मुंढे हे आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहूजन आघाडीकडून लढवणार आहेत. त्यामुळे बार्शी मतदारसंघातील घराणेशाही आणि व्यक्तीकेंद्रीत राजकारण संपवण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचं मुंढे यांनी म्हटलं आहे. बार्शीतील राजकारण हे व्यक्तीकेंद्रीत झालं असून हे नेते पक्षापेक्षा स्वत:च्या नावानेच राजकारण करत असल्याचा आरोप मुढे यांनी केला आहे. तसेच वंचितांना न्याय देण्यासाठी आपल्याला निवडून द्या असं आवाहनही प्राचार्य खुशाल मुंढे यांनी जनतेला केलं आहे.

COMMENTS