…त्यामुळे उर्जामंत्री बावनकुळेंवर आली लोकलने प्रवास करण्याची वेळ !

…त्यामुळे उर्जामंत्री बावनकुळेंवर आली लोकलने प्रवास करण्याची वेळ !

मुंबई – राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल चक्क लोकलने प्रवास केला आहे.  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईत सध्या वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. याचाच फटका बावनकुळे यांनाही बसला असून वाहतूक कोंडीत अडकून पडू नये यासाठी काल त्यांनी सीएसएमटीपासून मुलुंडपर्यंत लोकल ट्रेननं प्रवास केला.

दरम्यान आज सकाळी साडे अकरा वाजता बावनकुळे यांनी सीएसएमटीवरुन कळवा लोकल पकडली. यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत चर्चा केली. खड्ड्यांमुळे रस्ते वाहतुकीसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन लोकलनं प्रवास करत असल्याचं त्यांनी पत्रकारांना म्हटलं. तसेच ते महाराष्ट्राला वीज पुरवठा करणाऱ्या लो डिस्पॅच सेंटरची पाहणी करण्यासाठी आणि आढावा बैठक घेण्यासाठी मुलुंडला गेले होते. त्यामुळे बैठकीला वेळेत पोहचण्यासाठी त्यांनी लोकलनं प्रवास केला आहे.

COMMENTS