बीड – भुजबळांच्या समता मेळाव्यात राष्ट्रवादीतली गटबाजी उफाळली आहे. क्षीरसागर समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्यासमोर जयदत्त क्षीरसागर यांच्यावतीने प्रचंड घोषणाबाजी केली,यामुळे राष्ट्रवादीतील क्षीरसागर आणि मुंडे यांच्यातील वाद उफाळून आला आहे.
बीड येथे आयोजित समता मेळाव्यात भुजबळ यांचे आगमन होताच जयदत्त क्षीरसागर समर्थक स्टेजजवळ आले आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. बीड का नेता कैसा हो जयदत्त क्षीरसागर जैसा हो आशा घोषणा या लोकांनी दिल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी बोलून त्यांना स्टेजसमोरील मोकळ्या जागेत बसवले होते.
दरम्यान बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष सध्या पेटला आहे. क्षीरसागर यांचे पुतणे जी प सदस्य संदीप क्षीरसागर यांना अजित पवार, धनंजय मुंडे यांनी मनाचे स्थान दिल्याने घरातच महाभारत सुरू झाले आहे. काका विरुद्ध पुतण्या अशा या संघर्षात राष्ट्रवादीत गटबाजी उफाळल्याचे चित्र यावेळी दिसून आले. संदीप क्षीरसागर यांना पक्षाने झुकते माप दिल्याने जयदत्त समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे त्यांनी भुजबळ यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
COMMENTS