पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे कोरोना वरील उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयास नव्याने २१ व्हेंटीलेटर!

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे कोरोना वरील उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयास नव्याने २१ व्हेंटीलेटर!

बीड – कोरोना संसर्गावर उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनाच्यावतीने जिल्ह्यात नव्याने 21 व्हेंटीलेटर प्राप्त झाले असून सदर व्हेंटिलेटर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात रुग्णांवरील उपचारासाठी उपयोगात आणण्यात येणार आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

जिल्ह्यात प्राप्त झालेले व्हेंटिलेटर सद्यस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयात 12 व लोखंडे सावरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 9 असे एकूण 21 व्हेंटिलेटर पुढील कार्यवाहीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. नुकत्यात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटर देण्यात आले असून तेथील २६ व्हेंटिलेटर सह जिल्ह्यातील एकूण व्हेंटीलेटरची संख्या ४७ झाली आहे

पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेस बळकटी देण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर

कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला अधिकाधिक सुविधा व यंत्रणा उपलब्ध देण्या करून देण्यात येत असून त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. याच बरोबर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष अतिदक्षता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, यासह जिल्ह्यातील कोरोना विषाणूचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे नमुने वेळेत तपासून तातडीने उपचार करणे शक्य झाले आहे यासह प्लाजमा थेरेपी सेंटर देखील येथे मंजूर करण्यात आले आहे.

COMMENTS