बीड – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आणखी एक धक्का बसला असून भाजपच्या ताब्यातील जिल्हा बँक संदर्भात मोठ्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष व संचालक पदावरून तत्काळ कमी करण्याचे आदेश लातूर
विभागीय सहनिबंधकांनी दिला आहे. तसेच जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी बी.एस.देशमुख यांना निलंबित करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजनेमधील प्रोत्साहनपर रक्कमेच्या फेरफारी संदर्भात ठपका ठेवत विभागीय सहनिबंधकाने कारवाईचे आदेश दिले आहेत.
कर्ज माफीमधील प्रोत्साहनाची रक्कम बचत खात्यात जमा करण्याऐवजी कर्ज खात्यात जमा करून अफरातफर केल्याचा ठपका आदित्य सारडा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.या संदर्भात शेतकरी नेते कालिदास अपेट यांनी तक्रार केली होती. त्यानुसार सहकार कायदा 1960 यामधील कलम 79 व इतर पोट कलमान्वये दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे.
COMMENTS