बीड – दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यानं पिक विमा योजनेत मात्र देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे. बीड जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचा पीक विमा भरुन घेण्यात देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांचा दिल्लीतील विज्ञान भवनात सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेत देशातील तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये बीड, नांदेड आणि तमिळनाडू येथील शिवगंगा जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान 2016-17 मध्ये पीक विमा रक्कम भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पीक विम्याचं महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितलं होतं. शिवाय बँकेमार्फत विमा रक्कम भरून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळेच या जिल्ह्याचा अव्वल क्रमांक आला असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
COMMENTS