पंकजा, खा. प्रितम मुंडेंच्या प्रयत्नांना यश, बीडच्या रूग्णालयासाठी ५८ कोटींचा निधी मंजूर !

पंकजा, खा. प्रितम मुंडेंच्या प्रयत्नांना यश, बीडच्या रूग्णालयासाठी ५८ कोटींचा निधी मंजूर !

बीड – राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे उप जिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन झाले असून त्यासाठी ५८ कोटी २१ लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. श्रेणीवर्धन झाल्याने रूग्णांना अधिकाधिक चांगल्या सोयी सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिकाधिक बळकट करण्यासाठी व रुग्णांची गैरसोय दूर करून रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी बीड येथे सध्या असलेल्या शंभर खाटांच्या उप जिल्हा रूग्णालयाचे दोनशे खाटांमध्ये श्रेणीवर्धन करावे अशी मागणी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्फत आरोग्य विभागाकडे सातत्याने केली होती, तसा प्रस्ताव देखील आरोग्य खात्याकडे दाखल करण्यात आला होता. अखेर त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून आज आरोग्य विभागाच्या सचिव समितीने बीड येथे शंभर खाटांच्या रुग्णालयाला दोनशे खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबत मंजूरी दिली आहे शिवाय यासाठी ५८ कोटी २१ लाख रुपये इतका निधी मंजूर केला असून त्याला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

पालकमंत्री पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीड उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाला मान्यता मिळाल्याने आरोग्यसेवेला बळकटी मिळणार असून रुग्णांसाठी अद्ययावत व सुसज्ज अशी ईमारत मिळणार आहे. पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे रुग्णालयाकरीता गृहखात्याची जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले होते त्यानंतर गृहखात्याने रुग्णालयाकरीता जागा देण्यास मान्यता दिली होती.

COMMENTS