बीड – लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना तिकीट दिल्यानंतर जिल्ह्यातील आणखी एक गट नाराज असल्याचं दिसत आहे. मुंदडा गट अद्याप प्रचार यंत्रणेपासून अलिप्त असल्याचं पाहावयास मिळत आहे.
सुरुवातीला अमरसिंह पंडित समर्थक नाराज असल्याचे चित्र समोर आलं होतं. त्यानंतर आता अमरसिंह पंडित यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आलं असल्याचं दिसत आहे. परंतु आता मुंदडा गटाची नाराजी कशी दूर करणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान बजरंग सोनवणे यांचा जोरदार प्रचार जिल्ह्यात सुरु आहे. या प्रचाराला धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहत आहेत. परंतु
नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मात्र प्रचारापासुन दूरच राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केजमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला अक्षय मुंदडा गैरहजर राहिल्याने ते अजूनही पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
COMMENTS