बीड – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षबांधणी तसेच जिल्ह्यातील लोकसभेसाठी इच्छूक उमेदवारांचा आढावा तसेच मुलाखती घेण्यात आल्या. या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून ती लवकरच पक्षश्रेष्ठींकडे पाठविली जाणार असल्याची माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी दिली आहे. या बैठकीसाठी पक्षाचे जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे यांच्यासह माजी आमदार नारायण मुडे,सिरजभाई देशमुख, नेते बाबुराव मुडे,मा.अजिलिताई घाडगे,सेवादल नेते, शहादेव हिदोळे, ता.अध्यक्ष मा.महादेव धाडे,जिल्हा सचिव अॅड.विषणुपत सोळुके, महादेव आदमाने, सुनिलनागरगोजे,अँड.निबाळकर,सेवादल जि.अध्यक्ष योगेश शिंदे, बीड शहर अध्यक्ष डॉ.इदरीष हशमी , मा.सेल जि.अध्यक्ष गोविद साठे, मायनोरटी वि.अध्यक्ष आसीफोदीन खतिब, गणेश राऊत, अविनाश डरफे,फरीद देशमुख राणा चव्हाण , दादासाहेब मुडे, चरणसिंग ठाकुर, ,विजय मुडे,(परळी), सुर्यकांत मुंडे, डाँ.शेरखान,रवि ढोबळे (नाना), नागेश मिठे,महादेव मुडे,विठ्ठल जाधव,हरीभाऊ सोळुंके(माजलगाव)., राहुल वावळे,सफदर देशमुख ,शामसुंदर जाधव , जयप्रकाश प्रकाश आघाव आदी अनेक नेते उपस्थित होते.
दरम्यान बीड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे अनेक नेते इच्छूक असल्याचं पहावयास मिळालं आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच बाबुराव मुंडे यांना उमेदवारी देण्याबाबत बैठकीत एकमुखाने चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
यावेळी बाबुराव मुंडे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सरकारच्या कार्यकाळात राज्यात बेकरी, पेट्रोल डिझेल, गँस यांची प्रचंड महागाई, जिएसटी मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेकिन इंडिया ही योजना फसवी व दिशाभूल करणारी योजना आहे, प्रत्येक खात्यावर 15 हजार रूपये येणार होते. अशा अनेक विविध खोट्या योजना जाहीर केल्या आहेत. अशा दिशाभूल सरकारला नागरिक खाली उतरल्याशिवाय राहणार नसल्याचंही यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बैठका सुरु आहेत. त्यामुळे बीड लोकसभेची जागा कोणाकडे जाणार याबाबत अजूनतरी सांगता येणार नाही. परंतु ही जागा काँग्रेसकडे गेली तर कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS