बजरंग सोनवणेंच्या उमेदवारीमुळे पंडित समर्थक नाराज, धनंजय मुंडेंच्या काळात जिल्ह्यातील जुनेे नेते पक्षापासून दुरावल्याची चर्चा !

बजरंग सोनवणेंच्या उमेदवारीमुळे पंडित समर्थक नाराज, धनंजय मुंडेंच्या काळात जिल्ह्यातील जुनेे नेते पक्षापासून दुरावल्याची चर्चा !

बीड – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बीडमध्ये राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काही नेते नाराज झाले असल्याचं दिसत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. परंतु याठिकाणी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्याने पंडित समर्थक नाराज आहेत. पंडित समर्थकांमध्ये फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. अमरसिंह पंडित यांचे बंधू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी एक फेसबुक पोस्ट केल्याने जिल्ह्यातील वातावरण अधिकच तापले असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गेवराई येथे आज (शनिवार) संध्याकाळी आयोजित केलेली पक्षाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

कटू सत्य…!!!

Posted by Vijaysinh Pandit on Friday, March 15, 2019

आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.’ अशी पोस्ट विजयसिंह पंडित यांनी सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर शेअर केली होती. त्यामुळे पंडित यांच्यातील नाराजी समोर आली असून बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बनवण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी पुढाकार घेतला होता. असा अर्थ या पोस्टमधून निघत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
त्यामुळे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची गेवराई येथे होणारी बैठक रद्द करण्याची वेळ आली असल्याची माहिती  आहे.

दरम्यान बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच त्यांना तिकीट देण्यात आलं असल्याची चर्चा  जिल्ह्यात सुरु आहे. त्याचबरोबर सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना पडत्या काळात साथ दिली होती. परंतु धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते मात्र दुरावले गेले असल्याचं दिसत आहे. सुरेश धस, जयदत्त क्षिरसागर हे पक्षापासून दुरावले. याचबरोबर धनंजय मुंडे आणि अक्षय मुंदडा, प्रकाशदादा सोळंके यांचं फारसं काही जमत नाही. अशातच आता अमरसिंह पंडित हे देखील नाराज झाले असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी जुनी राष्ट्रवादी बाजूला सारली गेली असल्याची कुजबूज जिल्ह्यात सुरु आहे.

COMMENTS