बीड – राष्ट्रवादीचे नेते प्रकाशदादा सोळंकेंचा भाजपला धक्का !

बीड – राष्ट्रवादीचे नेते प्रकाशदादा सोळंकेंचा भाजपला धक्का !

माजलगाव –  आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. माजलगाव येथील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.  प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान भाजपाचे पुनंगाव येथील कार्यकर्ते हरिभाऊ विश्वनाथ कुरे, सदाशिव साहेबराव कुरे,लक्ष्मण आशुबा बहिरे,रुद्रा हरिभाऊ कुरे,प्रल्हाद भगवानराव कुरे, राधाकृष्ण ज्ञानोबा कुंभार,  रामेश्वर बालासाहेब मुळे,बालाजी बाबुराव गर्जे, (सेवानिवृत्त ग्रामसेवक),धर्मराज कारभारी कदम (पिंपळटक्का),नारायण कोंडीबा उंबरे (फुले पिंपळगाव),दत्तात्रय नामदेव नाईकनवरे (रेनापुरी) आदी कार्यकर्त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती आहे. या सर्वांचे पक्षाच्यावतीने माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके यांनी स्वागत केले आहे.

यावेळी सभापती अशोक डक, जयदत नरवडे, दीपक जाधव, दयानंद स्वामी,डॉ.भगवान सरवदे, बालासाहेब जाधव,नासेर पठाण, शेख मंजूर, निळंकठ भोसले, भीमकराव हाडुळे, दिपक साळवे, चांद्रकांत पवार ,सुनील शिंदे ,सिद्धेश्वर खराडे,नागु चव्हाण, खैरूल्लाखान, सय्यद नजीर,सचिन सोळंके,प्रशांत खुर्पे, मोहसीन बागवान,आदी नेते उपस्थित होते.

COMMENTS