बीड – परळीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला असून, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, बीड जिल्हा बँकेचे संचालक तथा गाढे पिंपळगावचे माजी सरपंच शरदराव राडकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व जिल्ह्यातील नेते मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग सोनवणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी त्यांच्या समवेत बाबुराव सोनवणे, चेअरमन पांडूरंग गंगणे, श्रीपती राडकर, बंडु क्षीरसागर, राजेभाऊ राडकर, वैजनाथराव सोनवणे, लक्ष्मणराव राडकर, इसाम शेख, गणेश फुटके, नरहरी आरसुळे, एकनाथ आरसुळे, अक्षय राडकर विनोद राडकर आदींचा प्रवेश झाला.
दरम्यान शरद राडकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाला मोठा हादरा बसला असून, गाढे पिंपळगाव परिसरात पक्षाची ताकद वाढणार आहे. शरद राडकर हे पूर्वी स्व.पंडितअण्णा यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आपण स्व.अण्णांच्या विश्वासत नेहमीच काम केले होते, परळी मतदार संघाच्या उज्वल भविष्यासाठी धनंजय मुंडे हे खंबीर नेतृत्व असल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे शरद राडकर यांनी सांगितले. यावेळी रा. काँ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ हे उपस्थित होते.
COMMENTS