बीड, परळी वै. – परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या प्रचार यंत्रणेकडून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ बँक, वैद्यनाथ देवस्थान, वैद्यनाथ महाविद्यालयाच्या कर्मचार्यांचा प्रचारासाठी वापर केला जात असून, निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या तत्वानुसार असा प्रचार करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहकारी संस्था, देवस्थान, बँका, शैक्षणिक संस्थांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करता येत नाही, असा वापर कोणी करत असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरूध्द कारवाई केली जाते. मात्र परळीत सर्रास भाजपाकडून त्यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखाना, वैद्यनाथ बँक, वैद्यनाथ महाविद्यालय, वैद्यनाथ देवस्थान, अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचार्यांना प्रचाराला जुंपले जात आहे, त्यामुळे या संस्थांमधील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रचार करणार्या कर्मचार्यांवर तातडीने कारवाई करावी, संस्था चालक, संस्था प्रमुखांवरही कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
COMMENTS