पालकमंत्रीसाहेब आम्हाला न्याय द्या, बीडमध्ये लहान मुलांसह उपोषणाला बसलेल्या महिलेची धनंजय मुंडेंकडे मागणी! VIDEO

पालकमंत्रीसाहेब आम्हाला न्याय द्या, बीडमध्ये लहान मुलांसह उपोषणाला बसलेल्या महिलेची धनंजय मुंडेंकडे मागणी! VIDEO

बीड – आपल्या दोन लहान मुलांसह पार्वती मुंडे या महिलेनं 17 फेब्रुवारीपासून जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे.
बेकायदेशीरपणे धारुर नगरपालिकेने कामावरुन कमी केलं असल्याचा आरोप करत या महिलेनं नगरपालिकेविरोधात उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत या लहान मुलांसह आपण उपोषण सुरु ठेवणार असल्याचं पार्वती मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उपोषणापूर्वी मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. परंतु या निवेदनाची कोणीही दखल घेतली नसून सर्वांना तत्काळ न्याय देणाय्रा पालकमंत्री साहेबांनी आम्हालाही लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्त्या पार्वती मुंडे यांनी केली आहे.

COMMENTS