बीडमध्ये शिवसेना-भाजपला आणखी एक धक्का, माजी आमदाराचा राष्ट्रवादीला पाठिंबा?

बीडमध्ये शिवसेना-भाजपला आणखी एक धक्का, माजी आमदाराचा राष्ट्रवादीला पाठिंबा?

बीड – लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यात राजकीय वारे चांगलेच वाहू लागले आहेत. अनेक नेते पक्षांतर करत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांना याचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता बीडमध्ये शिवसेना भाजप युतीला आणखी एक फटका बसत असल्याचं दिसत आहे. बीडचे माजी आमदार, शिवसेना नेते सुनिल धांडे यांनीही राष्टेरवादीला पाठिंबा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान सुनील धांडे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला तर याठिकाणी युतीला मोठा धक्का हयबसणार असल्याचं बोललं जात आहे. जिल्ह्यात सुनील धांडे यांचा जनसंपर्क मोठा असून याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. त्यामुळे सुनील धांडे यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS