परंडा – वंचितचे सिलेंडर रोखणार का घडयाळ आणि बाणाची घोडदौड?

परंडा – वंचितचे सिलेंडर रोखणार का घडयाळ आणि बाणाची घोडदौड?

भूम – परांडा विधानसभा मतदारसंघात अर्ज भरण्यापर्यंत दुरंगी वाटणारी निवडणूक शिवसेनेचे बंडखोर व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवारी घेतलेले सुरेशभाऊ कांबळे यांच्यामुळे चुरशीची होत आहे. शिवसेना उपनेते मंत्री प्रा.तानाजी सावंत हे परंडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होते पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भूम तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी पक्ष सदस्याचा राजीनामा देत वंचितकडून उमेदवारी दाखल केली.

विद्यमान आमदार राहूल मोटे हे चौथ्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे मातब्बर शिलेदार साथ सोडून सावंतच्या सोबतीला गेल्याने त्यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. मतदारसंघात असलेली धनगर मते व वंचितची दलित, मुस्लिम व ओबीसी वोट बँक यामुळे गॅस सिलेंडरच्या माध्यमातून वंचितचे सुरेश कांबळे हे आश्चर्यकारक निकालाची नोंद करतील अशी राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा होत आहे.

COMMENTS